ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.670

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७०

येकी सांगें मातु । येकी सांगें रे तुं । तो कोण दृष्टांतु । सखिये सांगें ॥१॥ बाई येक सरें । नाही पैं दुसरें । निवृत्ति दातारें । सांगितलें ॥२॥ पांचांची मिळणी । साही चक्रपाणी । दशमाची कहाणी । येकादश ॥३॥ ज्ञानदेवीं सार । चौ वेदीं पार । येकतत्त्वीं विचार । विज्ञानेंसी ॥४॥

अर्थ:-

तूं ज्या श्रीकृष्णाला पाहिले आहेस त्याची एखादी तरी गोष्ट मला सांग. त्या परमात्म्याच्या ठिकाणी दुसरेपणाचा मुळीच संबंध नाही. अशी खूण त्याच्या स्वरुपाविषयी निवृत्तिरांयानी सांगितली आहे. पंचकोशाहून वेगळा सहावा, दहा इंद्रियाहून वेगळा अकरावा, चारी वेदाहून पलीकडचा अशा परमात्म्याच्या एकत्वाविषयी विचार केला. तर तो विचारच विज्ञानासह परमात्म्याच्या ठिकाणी एकरुप झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading