ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.666

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६६

अद्वैताची झडपणी ब्रह्मीं निमाली । तन्मय तत्त्वतां ब्रह्मींच मुराली ॥१॥ परतोनी पाहणे परतोनी पाहणें । नाही त्या ठाया जाणे रुपेंवीण ॥२॥ बापरखुमादेविवरु रुपेंवीण देखिला । आटकु ठाकला द्वैताकारें रया ॥३॥

अर्थ:-

ज्या पुरुषाला अद्वैत आत्मबोधाने झडपले आहे. तो बोध आणि तन्मयत्व ही ब्रह्माच्या ठिकाणीच मुरतात.ज्या ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी वृत्ति पोहोचली असतां पुन्हा मागे परतून पहाण्यास शिल्लक राहात नाही. त्याठिकाणी जाणे म्हणजे आपले स्वतःच्या नामरुपाचा परित्यागच करणे होय. असे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल परमात्मा नामरुपावांचून मी पहिला म्हणून द्वैताकार जगत् प्रतितीचा प्रतिबंध निवृत्त झाला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading