ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.629

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२९

नव्हे त्याची दुराशा म्यां सांडिली वो आस । ज्ञान वैराग्यभक्तिसार वोळला वो माय ॥१॥ सच्चिदानंदघनु आनंदें ओळला । मग मज फावला हा विठ्ठल वो माये ॥२॥ संभोग वोवरी होतिये निदसुरी । योगिणी खेचरीं मज जागविलें वो माये ॥३॥ ऐसा हा योगिराजु तो विठ्ठल मज उजू बापरखुमादेविवर देऊ ठेलें वो माये ॥४॥

अर्थ:-

वस्तुतः सत्य नसलेल्या स्त्री धन पुत्रादि पदार्थाची मी आजपर्यंत आशा करात होतो. परंतु माझी दूराशाच झाली. ती मी नित्यानित्य विचाराने टाकून दिली आणि नित्य वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञान आणि वैराग्य आणि श्रीहरिच्या भक्तीरसाकडे वळलो. किंवा मी दुराशा टाकून दिल्यावर ज्ञान वैराग्य आणि भक्ति ही माझ्याकडे धावून आली. आणि त्याच्या माग सच्चिदानंद घन जो श्रीविठ्ठल तोही धावून माझ्यावर अनुग्रह करण्याकरता आला. त्यामुळे मला त्याची प्राप्ती झाली. व त्या परमात्मनंदाच्या अंतपुरांत मी स्वस्त निजलो असता जीवन्मुक्तीच्या विशेष भोगार्थ योगसाधनादि खेचरी मुद्रा तिने मला जागे केले. असे हे माझे पिता व रखुमाईचे पती योगेश्वर श्रीविठ्ठल, त्यानी हे सोपे पारमार्थिक धन मला दिले असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading