👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१८
शून्याचे भुवनीं स्वरूप अविनाश । प्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥ निळा रंग देखें सर्वांचें देखणीं । चैतन्य भुवनीं समरसा ॥२॥ ज्ञानदेवा ध्यान सच्चिदानंदाचें । सर्व ब्रह्म साचे येणें येथें ॥३॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे प्रणव ब्रह्मरूप आहे. त्या प्रमाणे अष्टांग योग साध्य असलेला शून्यरूप नील बिंदु तोही अविनाशी असून ब्रह्मरूपच आहे.सर्वांच्या दृष्टीला निळ्या रंगाचा बिंदु असला तरी त्याचा चैतन्य प्रकाश सर्व जगामध्यें पसरलेला असतो. ध्यानाचा अभ्यास केल्याने तो सच्चिदान ब्रह्मरूप आहे असे कळून येईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
