👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०७
निळावर्ण ब्रह्मरंध्र येक निकें । पहा माझे सखे भाविक ॥१॥ उन्मनि सदैव वसे अक्षय पंथें । लाऊनियां चित्तें तया गायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे यापरती खूण । नाहीं ऐसी आण वाहातसें ॥३॥
अर्थ:-
ब्रह्मरंधातील नील बिंदूकडे लक्ष ठेवा. ही जोड उन्मनी अवस्थेत होईल. अक्षयपणे चित्त त्याच्याकडे लावा या पलिकडे या मार्गाची खूण दूसरी नाही असे शपथ घेऊन माऊली ज्ञानदेव सांगतात.