ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 4

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४ ला.

बरवा वो हरि बरवा वो ।
गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सांवळा वो हरि सांवळा वो ।
मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥धृ॥
पाहतां वो हरि पाहातां वो ।
ध्यान लागलें या चित्ता वो ॥२॥
पढिये वो हरि पढिये वो ।
बापरखुमादेविवरू घडिये वो ॥३॥

अर्थ:-

जीवाचे कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा भगवान श्रीहरि म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा अशी हजारो नावे ज्याला आहेत; तोच श्रीहरि सर्वोत्तम आहे हो ! ॥१॥

तो सावळ्या वर्णाचा असून गाई राखतो खरा; परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे. ॥धृ॥

काय सांगावे ! त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लागून गेले आहे हो ! ॥२॥

तोच श्रीहरि मनाला वारंवार आवडतो हो ! असे त्या श्रीहरीचे रूप आहे. ॥३॥ जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥ ।

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading