👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३८
काळेपणाचा आवो अंबरी बाणला । तो एकु दादुला देखीयेला डोळा ॥१॥ काळे मनुष्य मानव जालें । अरुप रूपा आलें गोविंदपणें ॥२॥ रखुमादेविवरू विठ्ठलु सोहदरू । त्याने माझा वेव्हारू बहु काळे नेला गे माये ॥३॥
अर्थ:-
संपुर्ण गगनातील सावळेपण अंगावर असलेला तोच एक पती म्हणुन मी डोळ्याने पाहात आहे. असा सावळा वर्ण असलेला मानव बनुन आलेला ते अरुप असलेले गोविंद रुपास आले आहेत. असा जो निर्गुण असलेला सगुण होऊन माझे सर्व व्यवहार खुंटवले तो रखुमाईचा पती व माझा पिता विठ्ठल आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 37
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 39

[…] महाराज सार्थ गाथा अभंग ३७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]