👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३१
निळिये मंडळी निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी ध्यान रुपा ॥ वेधु वेधला निळा पाहे घननिळा । विरहणी केवळा रंग रसने ॥ नीळवर्ण अंध निळवर्ण स्वयंभ । वेधे वेधु न लभे वैकुंठीचा ॥ ज्ञानदेव निळी हृदयीं सांवळी । प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ॥
अर्थ:-
निलवर्ण आकाशा सारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बाल्यावस्तेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेध लागले. त्या आकाशीच्या निळेपणाला पाहुन त्या घननिळाचे वेध लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करु लागली. तो घननिळा व त्या निळ्यारंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेध लागले आहेत. त्या निलवर्ण असलेल्याला माझ्या हृदयात त्याच निळ्यारंगाने रंगुन त्यात प्रेमरस कल्लोळ करुन बुडी दिली असे माऊली सांगतात.

[…] ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३१,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३५,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३९,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४०, […]