ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 2

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग क्र. 1 पहा.   👉 अभंग क्र. 3 पहा.
🚩अभंग २ 🚩

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण #१ ले, रूपवर्णन अभंग क्रमांक २

अनुपम्य मनोहर । कांसे शोभे पितांबर । चरणीं ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥ योगियांची कसवटी । दावितसे नेत्रपुटीं । उभा भीवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरू । पुंडलिका अभयकरू । परब्रह्म साहाकारू । देखिला देवो ॥३॥

अर्थ:-

उपमारहित अत्यंत मनोहर रूप ज्या श्रीविठ्ठलाचे आहे, ज्याच्या कमरेला पीतांबर शोभत आहे, भक्तोध्दाराचा निश्चय हेच ज्याच्या पायांतील तोडे आहेत, असा श्रीविठोबाराय मी पाहिला हो. ॥१॥ तो विठोबाराय म्हणजे योग्यांची कसवटी आहे, हे त्याच्या नेत्रावरूनच दिसते.असा चंद्रभागेच्या तटावर उभा राहिलेला देवाधिदेव मी पाहिला हो. ॥२॥ त्याचप्रमाणे पुंडलिकाला अभयकर देऊन त्याला सहाय्य करणारा असा श्रीविठोबाराय मी पाहिला हो. ॥३॥

Leave a Reply