ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.107

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०७

परेसी परतें स्वरूप या हरिचें । भक्तिमार्ग साचे विरूढे रूप ॥ चला जाऊं पाहूं आत्मराज घटी । नामें नेतु तटी वैकुंठीचिया ॥ समाधि विधान हरिपाठगुण । उगियाची मौन असिजे रया ॥ ज्ञानदेव निवृत्ति पुसों जाय भाव । तंव तेणे स्वयमेव दाविले डोळां ॥

अर्थ:-

भक्ती मार्गाने गेले की परे हुन परते असणारे हरिस्वरुप निश्चयांने स्पष्ट दिसते. त्या जीवरुप घटात पाहिले की ते नाम पैलतीराचे वैकुंठच देते. त्या समाधी सौख्याची प्राप्ती करण्यासाठी निवांत मौन ठेऊन हरिस्मरण करत बसा. मी श्री गुरु निवृत्तिनाथांना हरिप्रातीचे उपाय विचारला तेंव्हा त्यांना हा नामाचा मार्ग माझ्या डोळ्यांना दाखवला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading