ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.922

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२२

सुची अंबुला ज्ञान घराचारु । भक्ति हे साकारु आवडली ॥१॥ काय सांगू माय निर्गुण अंबुला । शून्यीं मिळाला नाही ठाई ॥२॥ रखुमादेविवरु साकार अंबुला । मज पूर्ण आला बाईये वो ॥३॥

अर्थ:-

 सुची म्हणजे सूक्ष्माहूनही सूक्ष्म असणारा परमात्मा पति झाल्यानंतर माझा व्यवहार ज्ञानरुप झाला. त्याच्या साकार स्वरुपाची भक्ति मला फार आवडली. तो निर्गुण पति शून्य जी अविद्या तिचे कार्य जो प्रपंच त्यांत मिळाला नाही. ते निर्गुण रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते साकार होऊन माझ्याशी लग्न लावण्यास आले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading