ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.५२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५२

स्वरूपी पाहतां बिंबी बिंब उमटे । ते मेघःशाम दाटे बुंथी मनीं ॥ चित्त वित्त हरि झाला वो साजणी । अवचिता अंगणी म्यां देखीयेला ॥

सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडे । दिसे चहूंकडे एकतत्व ॥ ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसुनि पाही । एका रूपा सोयी बाही तरशील ॥ त्या

अर्थ:-

 मेघशामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे. त्या सगुण रुपाला अंगणात मी अवचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो.त्या चतुर्भुज परमात्म्याला

डोळ्यानी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले. त्या रुपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरुन जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *