ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.२१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २१

श्रुतिस्मृति वचन तो । गुह्यागुह्य तो गे बाई ॥ जागता निजता तो । निज चेवविता तो गे बाई ॥ परात्परा तो । रखुमादेविवरू तो गे बाई ॥

 अर्थ:-

श्रुती व स्मृतीनी सांगितलेली वचने तोच असुन तोच गौप्याचे गौप्य आहे म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असुन तो जीवाला चेतवणारा (चैतन्य रुप)ही तोच आहे. मायेच्या पलिकडील तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २१,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २५,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २९,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३०, […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *