धनंजय महाराज मोरे
श्री गणपतीची आरती
श्री गणपतीची आरती
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफ़ळांची ॥धृ॥
जयदेव जयदेव जय मंगल मुर्ती
दर्शन मात्रे मन:कामना पुरती जयदेव जयदेव
रत्नखचित फ़रा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडीत मुकुट शोभतो बरां
रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया ॥१॥
जयदेव जयदेव ….
लंबोदर पितांबर फ़णिवर बंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥२॥
जयदेव जयदेव ….घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥
प्रेमें आलिंगिन आनंदे पूजीन ।
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥
मंत्र पु ष्पांजलि
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासान् ।
ते ह नाकं महिमान: सचंत ।
यत्र पुर्वे साध्या: संति देवा: ।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् ।
पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिती ।
तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुत:परिवेष्टारो मरुत्तस्सावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति॥
प्रसाद
मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम !
राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम !!धृ!!
संसाराचा खेळ घडीचा इथेच हा राहणार !
पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार !
संकट काळी धावोनी येईल कौश्ल्येचा राम !!१!!
अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट !
चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षपदाची वाट !
भवसागर हा तारील तुम्हा भक्तांचा निर्धार !!२!!
राम नामे …
तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपुले गाव !
खाली आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ दिला आहे. आरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन चांगला देवा प्रतीचा भाव चांगला होतो. आणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्या पर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.
सुखकर्ता दु:खहर्ता. :-
म्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)
नुरवी म्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.
पुरवी प्रेम कृपा जयाची. :-
म्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो.
सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची ।।
म्हणजे:- गणेश सर्वांगाने सुंदर आहे.
त्याने शेंदुराची उटी लावली आहे ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
म्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे ।।१।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मन : कामना पुरती ।।धृ।।
म्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो !
तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस ।
तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ।।धृ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
म्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
म्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।।
म्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे ।।२।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
म्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
म्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुण त्याना सरळ मार्गावर आणणारया,
त्रिनयना
(३ नेत्र असणारया).
दास रामाचा वाट पाहे सदना ।
म्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास ( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३ ।।
म्हणजे :- हे सुरवरवंदना – सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.
निर्वाणी – अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .
-समर्थ रामदास स्वामी.
((संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ )).
लक्षात ठेवा ‘संकटी’ पावावे
संकष्टी नाही.
