२५४१, अभंग :- जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२५४१
जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥
ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥
सेवेसी विकिलें देहाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥
तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आम्ही ॥३॥

अर्थ
जपाचे निमित्त करून देहभान विसरून झोप घेतो. अशा व्यक्तीचे भजन म्हणजे अमंगळवाणीच असते बहुरूपी सोंग संपादन करतो त्याप्रमाणेच तो असतो.जो देहाच्या इच्छा पूर्ण करण्याकरता देवाच्या सेवेला मुकला देहाचे पालन पोषण करण्याकरता जो भक्ती व्यवसाय म्हणून करतो त्यांना देव कसा प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये मान सन्मान आणि दंभ आहे त्याची आम्ही फजिती करू.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading