नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५३९
आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥१॥
अवघियां केली काळें तडातोडी । अवसर घडी पुरों नये ॥ध्रु.॥
वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥
आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥
काम तरी क्रोध बुद्धी मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळले शांती ॥४॥
तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥
अर्थ
बसताना, झोपताना, जेवताना सारखे गोविंदाचे चिंतन चालू असते त्यामुळे त्रिभूवनात आनंद समवलेला मला दिसतोय. काळाने माझा आणि इतरांचा संबंधाचा ताडातोड केला असून माझ्या चित्तात गोविंदाचे स्मरण सारखे चालू असते व यामुळेच मला कोणाचेही स्मरण करण्यास अवसरच पडत नाही. माझ्या शरीराचे भाग पंचमहाभूतांच्या ठिकाणी वाटणीला घातले असून व्दैतभावच मी खंडीत केला आहे. माझ्या आवडीचा आहार तो म्हणजे हरीची भक्ती हा मला पुष्कळ भेटत आहे त्यामुळे इतर सर्व व्यर्थ संकल्प मावळून गेले आहेत. काम, क्रोध, बुध्दी देणारे विविध निश्चय आणि हे सर्व ज्या ठिकाणी तयार होते असे मन नाहीसे झाले असून आता केवळ आत्मज्ञान झाल्यामुळे शांती निर्माण झाली असून भ्रमाचे सर्व ओळसे नाहीसे झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या मनामध्ये श्रीरंगाचा रंग अभंग व एकनिष्ठ म्हणजे कधीही न भंगणारा बसला आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
