नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४८१
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर तीं माइके दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसानी ॥ध्रु.॥
अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणे एका मरणेंचि सरें । उत्तमचि उरे कीर्ती मागें ॥३॥
अर्थ
जर आपल्याला सुख मिळवायचे असेल तर देवाला आपलेसे करून घ्या देवाला आपलेसे केल्यावाचून सुख जीवाला मिळणारच नाही.एक देव सोडला तर बाकी सर्व पदार्थ माईक आहेत म्हणजे दुःख देणारे आहेत त्यांच्या आधी आणि अंति सुख देण्याचे अवसानच नाही. अविनाश अशा गोविंदालाच आपलेसे करून घ्यावे आणि आपल्या मनाला त्याचेच वेड लावावे. तुकाराम महाराज म्हणतात जो देवाला आपलासा करून घेतो त्याला एकदाच मरण येते पुन्हा त्याला जन्म येत नाही आणि त्याची उत्तम किर्ती मागे उरते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
