नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ११३४
कै वाहावे जीवन । कै पलंगी शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥धृपद॥
कै भौज्य नानापरी । कै कोरड्या भाकरी ॥२॥
कै बसावे वाहनी । कै पायी अनवाणी ॥३॥
कै उत्तम प्रावर्णे । कै वसने ती जीर्णे ॥४॥
कै सकळ संपत्ती । कै भोगणे विपत्ती ॥५॥
कै सज्जनाशी संग । कै दुर्जनाशी योग ॥६॥
तुका म्हणे जाण । सुख दुःख ते समान ॥७॥
अर्थ
अहो कधी आपल्या प्रारब्धानुसार डोक्यावर पाणी वाहण्याची वेळ आली तर पाणी देखील वहावे तर कधीकधी सुखाने पलंगावर झोपावे. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करून घ्यावे. कधीकधी विविध प्रकारचे पंचपक्वान्न खावे तर कधीकधी प्रारब्धाने कोरड्या भाकरी मिळाल्या तर त्या देखील खाव्यात. कधी चांगल्या प्रकारच्या वाहनात(बैल गाडी घोडे हत्ती) बसून फिरावे तर कधी अनवाणी पायी देखील जाण्याची वेळ आली तर चालावे. प्रारब्धानुसार आपल्याला जर चांगल्या प्रकारचे वस्त्र मिळाले तर कधी ते घालावे तर कधीकधी जीर्ण फाटलेले वस्त्र देखील घालण्याची वेळ आली तर घालावे. कधी संपत्तीचा भोग घ्यावा तर कधी विपत्तीचा देखील भोग घ्यावा. कधीकधी संत सज्जनांची संगती मिळते तर कधी कधी दुर्जनांशी गाठ भेट पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानी लोक तेच जाणावे की ज्यांना सुख आणि दुःख हे सर्व समान आहे. क
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
