ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. ४३१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४३१

अखंड तमासा डोळां देख निका । काळा निळा पारवा बाईयांनो ॥१॥ सदोदित नयनीं नयन हारपे । निळ्याचे स्वरूपें मनी वसो ॥२॥ अकरा वेगळें नाही बा आणिक । माझे नेत्री देख शुध्द ज्योती ॥३॥ ज्ञानोबाची वाणी पूर्णरूपी घ्यावी । देहींच पाहावी आत्मज्योती ॥४॥

अर्थ:-

तुम्ही आपल्या डोळ्यांनी काळ्या निळ्या पारव्या रंगरूपानी नटलेल्या जगताचा देखावा पहा. त्या परमात्म्या कडे सतत डोळे लावले असतां डोळ्याचा डोळेपणा विसरून नीलवर्णरूप असलेला जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन वसुन राहाते. व तसे झाले म्हणजे दहा इंद्रियापलीकडील जे अकरावे मन तें परमात्मरूप होते. तद्व्यतिरिक्त कांहीही स्फुरत नसते व अशी स्थिती झाली असता माझ्या डोळ्यातील शुद्ध तेजाची ज्योत प्रतीतीला येते. माझ्या सांगण्याचा पूर्ण विचार करून या देहांत ती आत्मज्योत पहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *