ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.343

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३४३

डोळांची पाहा डोळां शून्याचा शेवट ।नीळबिंदु नीट लखलखित ॥१॥ विसावों आलें पातले चैतन्य तेथें । पाहें पां निरूतें अनुभवें ॥२॥ पार्वतीलागी आदीनाथें दाविलें ।ज्ञानदेवा फावलें निवृत्तिकृपा ॥३॥

अर्थ:-
शून्याचा शेवट असलेले डोळ्यांचा डोळा असलेले असे जे निर्गुण स्वरूप त्यांचे योगाभ्यासाने योगी अवलोकन करीत असतांना योग्यांना एक तेजस्वी निळा बिंदु दिसतो.१ त्यांत हे चैतन्य ठसावलेले आहे हे अनुभवाने नीट पाहता येते. हेच स्वरूप शकराने पार्वतीला सांगितले. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने मी ही पाहिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading