ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.988

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट  अभंग ९८८

पति जन्मला माझे उदरीं । मी जालें तयाचि नोवरी ॥१॥ पतिव्रता धर्म पहा हो माझा । सर्वापरी पति भोगिजे वोजा ॥२॥ निर्गुण पति आवडे मज । आधीं माय पाठी झालिये भाज ॥३॥ मी मायराणी पतिव्रता शिरोमणी । ज्ञानदेवो निरंजनीं क्रीडा करीं ॥४॥

अर्थ:-
मायेची भूमिका घेतलेली गवळण म्हणते. पति जो ईश्वर तो माझ्या पोटी जन्माला आला म्हणजे माझ्यामुळे त्याला ईश्वरत्व आले. असे जरी असले तरी मी त्याच्या आज्ञेत वागते. म्हणजे मला त्यांच्याहून स्वतंत्र सत्ता नाही. अर्थात् मी त्याचे नोवरी झाले. आतां माझा पतिव्रता धर्म पाहा की मी सर्व प्रकारांनी व्यवस्थित पतिचा उपभोग घेते. मला निर्गुण पति फार आवडतो. मी अगोदर त्याची आई होऊन पाठीमागून त्याचीच बायको झाले. मीच त्याची पट्टराणी असे असून सुद्धा पतिव्रतेतील अग्रपूजेचा मान मलाच आहे.माऊली ज्ञानदेवानी हे सर्व पाहून या स्वरूपाच्या ठिकाणी जनसंपर्क नाही अशा अद्वैतस्थितीत क्रीडा केली.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading