ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.977

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७७

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७७

पुरूषेवीण नारी संचरली शरीरी । आपण्यावरी आळु आला ॥१॥ काय कोण्या सांगें सिणलीये अनुरागें । पडिलिये पतिसंगें अवस्थाभूत ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु जैसा तैसा । व्यापूनि आकाशा उरला असे ॥३॥

अर्थ:-
साक्षात् श्रीकृष्ण यांच्या संचारावांचून जिच्या शरीरांत कामाने संचार केला अशी विव्हळ झालेली स्त्री मनांत म्हणत आहे. आपल्यावर हा व्यभिचाराचा आळ आला. कोणावर प्रेम ठेवून त्याच्या संगतीने ही इतकी क्षीण पावत आहे.ती त्या पतिच्या संगामुळे अशी विव्हळ होऊन पडली आहे.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसे आहेत तसाच आहे आणि आकाशाला व्यापून उरला आहे.

दुसरा अर्थ- कूटस्थाचे ठिकाणी पुरूषभाव नसताना बुद्धिरूपी स्त्रीने त्याचे शरीरांत प्रवेश केला. म्हणजे कूटस्थाकार झाली. त्यामुळे तिच्या ठिकाणी व्यभिचाराचा आळ आला. काय सांगावे कोणत्या प्रेमा विषयी क्षीण पावत आहे. म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीला सोडत आहे. ती कूटस्थरूप पतिच्या संगतीत पडल्यामुळे अशी अवस्थारूप झाली म्हणजे कूटस्थरूप झाली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसा आहेत तसाच ते आकाशाला व्यापून राहिले आहेत. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading