ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.951

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९५१

चवळ्याची सांगेन मातु । चवाळें पांघुरे पंढरीनाथु ॥१॥ गोधनें चारितां हरि पांघुरला । मज चवळ्याचा त्यागु पैं दिधला ॥२॥ बापरखुमादेविवरू श्रीगुरूराणा । चवाळें पांघुरवी निरंजना गे माय ॥३॥

अर्थ:-
या परमात्मबोधरूपी घोंगड्याची गोष्ट अशी आहे की, हे घोंगडे एक पांडुरूगरायच पांघरत असतो. भगवंताने हे घोंगडे गाई चारत असता पांघरले होते. मला मात्र प्रथमच त्याने हे चवाळे पांघरण्यास दिले. म्हणजे परमात्मबोध प्रथमच दिला. नंतर ते घोंगडे त्या श्रीकृष्णाने माझ्याकडून काढून घेतले. म्हणजे मला परमात्मबोध झाला आहे. अशा तऱ्हेचा माझ्या ठिकाणचा अभिमानही काढून टाकला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच सद्गुरू असून त्यांने एकांतामध्ये मला हे बोधरूपी घोंगडे पांघरण्यास दिले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading