ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.947

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९४७

अद्वैत पेठेहुनी घोंगडे आणिलें । अमोलिक घेतले पंढरिये ॥१॥
चौ हातांची भरणी आली । तिये चराचरीं ऐसें नाहीं ॥२॥
रखुमादेविवरू विठ्ठली नीट । पांघुरविलें वैकुंठ मज देखा ॥३॥

अर्थ:-
अद्वैताच्या बाजारांतून हे परमात्मरूपी अमोलिक आणलेले घोंगडे आम्ही पंढरीस घेतले. हे लांबी रुंदीला परिपूर्ण असून असे दुसरे घोंगडे चराचरांत नाही. या रखुमाईचे पती श्रीविठ्ठलानी मला हे घोगडे नीटपणे पांघरविले आहे. असे माऊली सांगतात.

Leave a Reply