ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.944

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके  घोंगडी अभंग ९४४

घोगडी घेऊनि हाटासि जाये । पंढरिये आहे वस्ती आम्हां ॥१॥
घोंगडियाचे मोल पैं जालें । चरणी राहिले विठ्ठलाचे ॥२॥
घोंगडें येक बैसले थडी । उभयां गोडी विठ्ठलाची ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे । शहाणे ये खुणे संतोषले ॥४॥

अर्थ:-
आम्ही वारकरी पंढरपूरात राहात असून व्यापारी आहोत हे घोंगडे घेऊन संतांच्या बाजारात गेलो’ त्याठिकाणी त्या घोंगडीचे चांगले मोल झाले ते मोल म्हणजे श्रीविठ्ठलाचे ठिकाणी आम्ही एकरूप झालो. चंद्रभागेच्या काठांवर एक घोंगडे(पुंडलिक) बसले आहे. त्याला विटेवर उभे असलेल्या
श्रीविठ्ठलाची जोडी असून त्यांना एकमेकाची गोडी आहे. अनुभवी पुरूषच हे माझे बोलणे समजतील. आणि तेच शहाणे या माझ्या खुणेच्या बोलण्याने संतोष पावतील. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading