ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.942

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी  अभंग ९४२

चौऱ्याशी लक्ष हिंडतां हाट । पुंजे दाट सापडले ॥१॥
हित ये खेपेंसी बरवें जालें । सुरंग घोंगडे हाताशीं आलें ॥२॥
येणें पाडें न माये कोठें । घोंगडें मोठें सांपडलें ॥३॥
मनोरथ पुरले रे आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठलाशी ध्यातां ॥४॥

अर्थ:-
चौऱ्यांशी लक्षयोनी हाच कोणी एक बाजार त्यांत फिरता फिरता म्हणजे जन्म घेता घेता मोठ्या पुण्याईने मला हा मनुष्यदेह प्राप्त झाला. या मनुष्यदेहाच्या खेपेला आलो हे फार चांगले झाले. कारण मनुष्यदेहातच च परमात्मैक्य बोधरूपी सुंदर घोंगडे हाती आले. हे परमात्मरूपी घोंगडे इतके मोठे आहे की ते कोठे मावतच नाही. असे मोठे घोंगडे सांपडले. असा मनुष्यरुपी शरिराला आल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान करता आले व त्यामुळे माझे मनोरथ परिपूर्ण झाले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading