ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.925

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२५

अंबुला होता तो लेंकरु जाला । घराचार बुडविला बाईयांनो ॥१॥ झणी अकुळी म्हणाल उणें । तुम्ही जाणते जाणा परमार्थ खुणें ॥२॥ रखुमादेविवरे विठ्ठले भोगियेलें । लंपट जहालिये सहजानंदीं ॥३॥

अर्थ:-

अंबुला म्हणजे माझा पति होता तोच माझा लेकरु होऊन म्हणजे लेंकरु जसे आईला प्रेमाचे विषय असते त्याप्रमाणे तो प्रेमाचा विषय होऊन मी माझ्या घरादाराचे वाटोळे केले. ही गोष्ट मी वाईट केल्यामुळे मी कुलवान असता मी कुलवान नाही असे तुम्ही मला म्हणाल परंतु जाणते असाल तर ती परमात्म्याची खूण जाणाल. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांनी माझा भोग घेतला आणि त्या आनंदात मी अगदी आनंदी होऊन गेले. असे माऊली सांगतात.

Leave a Reply