ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.924

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२४

सगुण अंबुला निर्गुण पै जाला । घराचार समस्त बुडविला ॥१॥ आशा हे सासु असतां बुडविली । शांति माऊली भेटों आली ॥२॥ रखुमादेविवर विठ्ठलेंसी चाड । अद्वैतेंसी माळ घेउनी ठेलें ॥३॥

अर्थ:-

जो सगुण श्रीकृष्ण परमात्मा तोच माझा पति निर्गुण झाला. आणि माझा सर्व घराचार म्हणजे व्यवहार बुडवून टांकला. मला रात्रंदिवस जाच करणारी सासू जी आशा ती बुडवून टांकली. आणि शांति माऊली मला भेटण्याला आली. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याचीच फक्त मला चाड असल्यामुळे आतां मी अद्वैताची माळ घेऊन राहिले आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading