ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.923

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२३

अंबुला विकून घेतली वस्तु । घराचार समस्तु बुडविला ॥१॥ उठोनी गेलिये अज्ञान म्हणाल । म्यां तंव कैवल्य जोडियेलें ॥२॥ अंबुला सांडुनी परावा केला । संसार सांडिला काय सांगों ॥३॥ रखुमादेविवरें मज पर्णुनी नेलें । सुखची दिधलें काय सांगो ॥४॥

अर्थ:-

लौकिकांतील चमत्कार काय सांगावा निर्गुण परमात्मा विकून त्याच्या स्वरुपावर मिथ्या भासणारी जगतादि वस्तु ही आपले गळ्यांत बांधून घेतली आणि सर्व व्यवहार दुःखांत बुडवून टाकला. म्हणजे दुःखरुप जो प्रपंच त्याविषयी केला.शेवटी माझे मनांत असा विचार आला की हा संसार तर दुःखरुप आहे. म्हणून मी त्या संसारांतून उठून परमात्मरुप पतिकडे गेले. हे लोकव्यवहारांच्या दृष्टिने वाईट म्हणून मला तुम्ही अज्ञानी म्हणाल परंतु मी तर मोक्षाची प्राप्ती करुन घेतली. व्यवहारांतील नवऱ्याचा परित्याग करुन परमात्मा पति केला. आणि संसार टाकून दिला रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानी माझ्याबरोबर लग्न लावून आपल्या स्वरुपांत नेले आणि सुखरुप केले. असे माऊली सांगतात.

Leave a Reply