ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.३४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३४

निळे हें व्योम निळे हें सप्रेम । निळेपणे सम आकारलें ॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रमगुरु देखे ॥ निळेपणें वर्तो निळपणे खातों ।

निळेपण पाहतों निळेपणे ॥ ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा । निळेपण गोंवळा रातलीये ॥

अर्थ:-
त्या परमात्म्यावरिल प्रेमामुळे त्याचे निळेपण घेऊन आकाश आकारले असुन सर्व जग ही निळेपण घेऊन सम झाले आहे. त्या परब्रह्माचा निळावर्ण पाहुन भक्त आपली कर्मे ही नीळस्वरुपातच करत आहेत

व त्यामुळे तो आश्रम ही निळा झाला आहे. सर्व अन्न निळेच वाटत आहे. निळेपणेच प्रगट वर्तत आहे व पाहायला गेले तर सर्वत्र निळेपणच दिसत आहे. त्या निळेपणात मी रंगुन गेल्याने त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *