ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १

रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥२॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर। बापरखुमादेविवर ॥४॥

अर्थ:-

ज्ञानेश्वर माऊली हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात

अर्थ:-

 Dnyaneshwar Mauli says that when I saw this physical form (Roop) with my spiritual eyesight (given by Satguru), pleasure emerge out.Yes,yes,this is that Vitthal,this is that Madhav who is supreme beautiful. The virtue of previous births has resulted in interest of God.He is the stock, source of all the pleasures.

अभंग क्र. २ पहा.

Sant Dnyaneshwar Maharaj sartha Abhang Gatha

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *