भोंवताले जाळे घाली न
572.
भोंवताले जाळे घाली नेटे पाटें| हस्तकी तिखट बाण धरी ॥१॥
येतील उदकपानासी सावजें| पाहे त्याचे व्याजे रोखोनिया ॥२॥
तेथे एक बिल्ववृक्ष महाथोर| वेधोनिया वर बैसलासे ॥३॥
डोळ्याआड आली म्हणोनिया तोडी| अंतरी आवडी आमीषाची ॥४॥
बकाचियेपरी ध्यानस्थ राहिला | जीवींचा जिव्हाळा वेगळाची ॥५॥
नामा म्हणे ऐसी देवाची नव्हाळी| न करिता जाली देवपूजा ॥६॥
