लक्षवरी बिल्व दले मा
573.
लक्षवरी बिल्व दले माथा पाहे| आनंद न समाये महादेवा ॥१॥
बहुता काळाचे तेथे एक लिंग| होते भूमिभाग होउनिया ॥२॥
भोळा महादेव तेणे संतोषला | म्हणे करिता जाला कोण पूजा ॥३॥
नामा म्हणे पाहे निमित्याची वाट | पुराणी बोभाट असे त्याचा ॥४॥
