वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

तंव बोलत उद्धव | धन्

🙏 4. संत नामदेव · ABH-081731 · अभंग क्र. १००१

1001.
तंव बोलत उद्धव | धन्य धन्य हा देवाधिदेव | धन्य धन्य ज्ञानदेव | निजभक्त आवडता ॥१॥
धन्य तीर्थ इंद्रायणी |धन्य प्रत्यक्ष शूळपाणि | तारक ब्रह्म त्रिवेणी |मिश्रित रूपेरी वहातुसे ॥२॥
चिंतामणि हे पाषाण | दिव्य वनवल्ली जाण | जेथे लागले हरिचे चरण | ते धन्य आळंकापुरी ॥३॥
जेथे समाधिसी बैसता | इंद्रादि सामोके येती तत्वता | वैकुंठा जाईल निभ्रांता | रामकृष्ण उच्चारित ॥४॥
यम न पाहे इकडे | काळ नमस्कारी वाडेंकोडे | म्हणती पाहा हो केव्हढे | भाग्य या ज्ञानदेवाचे ॥५॥
ऐसे उद्धव सांगे रुक्मिणी | होय म्हणती चक्रपाणि | पंढरीहुनि हे जुनाटपुराणी |शैवागमी बोलिलेसे ॥६॥
ज्ञानदेवे नमस्कार केला | नामा ह्रदयी धरिला | प्रीतिचे पुढती आलिंगिला | म्हणे धन्य धन्य रे सखया ॥७॥
नामा लोळत गडबडा | चरणरजालागी झाला वेडा | केशव म्हणे तू धडफुडा | विष्णुभक्त साचार ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग