वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ऐसी प्रदक्षिणा करूनी

🙏 4. संत नामदेव · ABH-081725 · अभंग क्र. १००२

1002.
ऐसी प्रदक्षिणा करूनी विष्णुभक्ता | नामा जालासे सरता | रुक्मिणी म्हणे याते तत्वता | वैकुंठासी न्यावे जी ॥१॥
नामा म्हणे नेघे मुक्ती | मज पंढरीची आर्ती | विठ्ठलनामे करीन कीर्ती | नित्यकाळ जीवन्मुक्त ॥२॥
मज नित्यमुक्ता जन्म नाही | केशवासी माते पुसोनि पाही | युगानयुगी अवतार दाही | याचेनि संगे मज घडती ॥३॥
तिही त्रिभुवनी उदार | मुक्ति तुम्हापाशी साचार | परि भक्तिविण मुक्ति असार | कोण पामर इच्छिल ॥४॥
मुक्ति फलकट नैश्वर | फळ एक विठ्ठल सार | विष्णुभक्तीसी ज्याचा निर्धार | त्यांचे चरण वंदीन माथा ॥५॥
विष्णुविण कीर्तन न करी | भक्तिविण नसे क्षणभरी | कीर्तन करीन गजरी | रामकृष्णगोविंद ॥६॥
मज नामाचे अम्रुत | माझे मुक्ति दास्य करी | तू मूळमाता जाणसी जरी | तरी तुजसी हे गुह्य बोलिलो ॥७॥
नामदेव परतोनी पाहे | तंव ज्ञानदेवे उभारिले बाहे | म्हणे विष्णुभक्ति ऐसी आहे | आइक माते इचा बडिवारू ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग