वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

तंव तेथे नवल वर्तले

🙏 4. संत नामदेव · ABH-081709 · अभंग क्र. १०००

1000.
तंव तेथे नवल वर्तले | आकाश असे विमानी दाटले |म्हणती मूळपीठ वैकुंठ देखिले | पुंडलिकासगट ॥१॥
पंढरीहुनि आले कैसे | पुंडलिक देव सरिसे | ज्ञानदेवासवे नामा असे | आणि विष्णुभक्त अपार ॥२॥
राही रखुमाई सत्यभामा | गाई गोपाळ मेघ:श्यामा | म्हणती पाहाहो महिमा | या विष्णुभक्तांचा ॥३॥
सवे ध्रुव प्रल्हाद अंबॠषी | रुक्मांगद सूर्यवंशी | आणि ॠषीमुनी तापसी | ऐसिया समवेत वनमाळी ॥४॥
बळी भीष्म नारद |उद्धव अक्रुर विद्गद |आणि बिभीषण सुबुद्ध | हनुमंतादि करूनि ॥५॥
हा हा हु हु गंधर्व गाती | रूणुझुणु रूणुरुणु विणे वाजती | देवांगना आरतिया ओवाळिती | देवभक्तासहित ॥६॥
ऐसा शुभ काळ समयो | जाला भाग्याचा उदयो | ज्ञानदेव नामदेव पाहाहो |धन्य धन्य धरातळी ॥७॥
नामा नुघडी द्रुष्टीसी | ह्रदयी ध्यातुसे ह्रषिकेशी | ज्ञानदेवो निजमानसी |विष्णुमूर्तीसी लीन झाला ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग