सूर्य अभ्रामाजी सापड
226.
सूर्य अभ्रामाजी सापडला तरी ।
काय तेज तरी उणे होय ॥१॥
तैसा जाण साधू दिस प्रपंचात ।
परि तो अतीत सर्व कर्मी ॥२॥
सुवर्ण पुरिले जरी पृथ्वीआत ।
आक ते हारपत तयेमाजी ॥३॥
सूर्य उदकात बिंबला आपण ।
तोय त्यालागून काय बाधे ॥४॥
वदन आरशात बिंबले दिसत ।
आरशाचे तेथ काय लागे ॥५॥
बहेणि म्हणे रंगी ठेविला स्फटिक ।
रंग त्या बाधक होईल काय ॥६॥
