तोचि रे भवरोग फेडील
225.
तोचि रे भवरोग फेडील अंगीचा ।
जयासी शांतीचा भाव देही ॥१॥
इतर ते व्यर्थ दांभिक कासया ।
पाडिती संशयामाजी लोका ॥२॥
तोचि रे निरसील भावपाश सर्वही ।
जया बोध देही सर्वकाळ ॥३॥
तोचि रे दवडील माया अंधकार ।
जयासी विकार नाही स्वप्नी ॥४॥
तोचि रे उतरील विषयविष पाहे ।
भूतकृपा राहे जयामाजी ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी करावी परीक्षा ।
पावसी अपेक्षा सहजगुणे ॥६॥
