सर्पाचे सारिखा दोर आ
227.
सर्पाचे सारिखा दोर आहे जरी ।
देखिलियावरी सर्प जाला ॥१॥
तोचि निश्चयाने पाहिलियावरी ।
वस्तु तेचि खरी वस्तुरूपे ॥२॥
शिंपीची झगमगी रूपेचि वाटते ।
मृगजळे भरते भूमंडळ ॥३॥
स्तंभ हा पुरूष नये निश्चयासी ।
खोटी मुद्रा जैसी खरी वाटे ॥४॥
करणिचे रत्न देखियेले डोळा ।
सारविला निआळ काच भूमी ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा ज्ञानेचि हाराश ।
साधन ते त्यास विवेकाचे ॥६॥
