वाचे बोलविले देवे ।
822.
वाचे बोलविले देवे ।
मज हे काय होते ठावे ॥१॥
सहज नामे आळविता ।
ओघ आला हा अवचिता ॥२॥
संत जाणती अंतर ।
की हा रखुमाईचा वर ॥३॥
निळा म्हणे पुसिलि गोठी ।
नये सांगता ते गोमटी ॥४॥
822.
वाचे बोलविले देवे ।
मज हे काय होते ठावे ॥१॥
सहज नामे आळविता ।
ओघ आला हा अवचिता ॥२॥
संत जाणती अंतर ।
की हा रखुमाईचा वर ॥३॥
निळा म्हणे पुसिलि गोठी ।
नये सांगता ते गोमटी ॥४॥