वाउग्या खटपटा ।
821.
वाउग्या खटपटा ।
नावडती तैशा चेष्टा ॥१॥
जेणे पावे भ्रंश बुध्दी ।
न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥
घालिती घालणी ।
काय करु ते बोलणी ॥३॥
निळा म्हणे मिथ्यावाद ।
काय करावे ते छंद ॥४॥
821.
वाउग्या खटपटा ।
नावडती तैशा चेष्टा ॥१॥
जेणे पावे भ्रंश बुध्दी ।
न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥
घालिती घालणी ।
काय करु ते बोलणी ॥३॥
निळा म्हणे मिथ्यावाद ।
काय करावे ते छंद ॥४॥