जग जोगी जग जोगी । जा
102.
जग जोगी जग जोगी । जाग जाग बोलती ॥१॥
जागता जगदेव । राखा कांही भाव ॥धृ॥
अवघा क्षेत्रपाळ । पूजावा सकळ ॥२॥
पूजापत्र कांही । फल पुष्प तोय ॥३॥
बहुता दिसा फेरा । आला या नगरा ॥४॥
नका घेऊ भार । धर्म तो चि सार ॥५॥
तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥६॥
जयजय विठोबारखुमाई
भजन म्हणावे
