कोटी कंदर्प सांडा वो
535.
कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥
हेळु लोपला तेजे जे देखता मन निवे । दरुशने भागले हेवा करता गे गाय ॥२॥
मदन मनमोहन सनकासनंदन वंद्य । सर्वाठायीं व्यापुनी उभे विटे आनंद ॥३॥
सुखाची सुखमूर्ति पूडांलिकाचे भक्ति । एका जनार्दनी सगुण व्यक्तिसी आला ॥४॥
