क्षीरसागरीचें निजरुप
534.
क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभे असे ते रोंकडे । पंढरीये गोजिरे ॥१॥
पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करी । कास कसिली पिंताबरी । हृदयावरी वैजयंती ॥२॥
भीमरथी वाहे पुढा । करित पापाचा रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥
शरण एका जनार्दनी । त्रैलोक्याचा धनी । नाचतो कार्तनीं । भक्तांमागें सर्वदा ॥४॥
