वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ऐसे संतोषले देव | प्

🙏 4. संत नामदेव · ABH-081704 · अभंग क्र. १०१६

1016.
ऐसे संतोषले देव | प्रसन्नरूपे माधव |मग बोलती ज्ञानदेव | विठ्ठलाप्रती ॥१॥
धन्य धन्य तू विठ्ठला | धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला | धन्य समारंभ येथिला | सोहळा करिसी भक्तांचा ॥२॥
तुझेनि आम्ही धन्य | ये जगत्रयी देवा मान्य | म्हणती भक्तांसमान | न देखो त्रिभुवनी ॥३॥
तू विश्वात्मा विश्वरुप | तू जगाचे स्वरूप |तुज न लिंपे पुण्यपाप |सदा शुध्द बुद्ध अससी ॥४॥
तू आम्हा भक्ता सरिसा | सवे हिंडसी जगदीशा | तुजविण अष्टदिशा | मज शून्य वाटती ॥५॥
तरी तू पाळिसी भक्त लळा | केला समाधीचा सोहळा | तो दाखविला मज डोळा | दिव्य दृष्टी देवोनी ॥६॥
तू सत्वरजतमात्मक | तू सकळ जीवांचा चालक | तूंचि त्रिमूर्ती अवघा एक | विराटस्वरुप सकळ ॥७॥
भक्तभाग्य भूमींतळी | याकारणे तू वनमाळी | दहा अवतार भूमंडळी |नाना चरित्रे खेळसी ॥८॥
ऐसे महिमान अगाध | ते तुझे विश्वस्वरुप प्रसिद्ध | कोण भाग्याचा मी प्रबुद्ध | तो तू मजकारणे आलासी ॥९॥
नामा म्हणे ज्ञानदेवे | ऐसी स्तुति केली स्वभावे | तंव कृपा करुनिया देवे | अभयंकर दीधला ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग