वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गंगा देखोनिया सिद्धे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075809 · अभंग क्र. ७

7.
गंगा देखोनिया सिद्धेश्वर देव ।
तेथोनिया जीव निघो नेणे ॥१॥
आवडीचा हेत पूर्वील संस्कार ।
श्रवणी आदर कीर्तनाचे ॥२॥
पुराण-श्रवण पूजा देवस्थान ।
ब्राह्मणपूजन प्रीति यांची ॥३॥
संन्यासी सज्जन संत महानुभाव ।
यांचे पायी जीव लागलासे ॥४॥
निघता तेथुन थोर वाटे दुःख ।
अदृष्ट करंटे काय कीजे ॥५॥
बहेणि म्हणे पुढे महादेवा जावे ।
भ्रतार गौरवे नेत आम्हा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग