उत्तम मध्यम कनिष्ठ य
879.
उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाही काम । जपावे ते नाम आधी आधी ॥१॥
वर्णाश्रम धर्म याचे नाही काम । जपावे ते नाम आधी आधी ॥२॥
रज तम सत्व यांचे नाही काम । जपावे ते नाम आधी आधी ॥३॥
एका जनार्दनी हे परतें सारा । जपा रघुवीरा एका भावे ॥४॥
