वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

न कळसी वेदा विबुधा श

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075983 · अभंग क्र. २८

28.
न कळसी वेदा विबुधा शास्त्रा श्रवणाने ।
न पडसी ठाई अनेक-परिच्या मननाने ।
नेणति योगीजन ते इंद्रिदमनाने ।
ऐसे तव रूप बोधत सद्गुरुवचनाने ॥१॥
जयदेव जयदेव जयजी चित्सूर्या ।
प्रकाशघन हृद्भुवनी निजसाक्षी तुर्या॥ध्रु०॥
शेषहि श्रमला स्तविता जिव्हा हे चिरली ।
ब्रह्मा वदता वाणी बुद्धि वोसरली ।
ध्याने शंकर श्रमला मग गंगा धरिली ।
अपार महिमा न कळे हे कीर्ति उरली ॥२॥
शब्दे न पडसी ठाई लक्षातित लक्षू ।
हेही न घडे अतीत वर्तासि निजचक्षू ।
उत्तम पुरुषा लक्षुनि टाकियला वृक्षु ।
बहणि उद्वय चरणी उत्तम हा पक्षू ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग