हुंबरीच्या मिषे हुतु
234.
हुंबरीच्या मिषे हुतुतु खेळती । गडयांशी श्रीपति सर्वकाळ ॥१॥
कळंबाचे झाडाखाली कुंकमाचे सदे । गोपाळा पवाडे दावीतसे ॥२॥
काय काय सागे घेसी नानापरी । गोपिकांचे घरी काम सारी ॥३॥
नामा ह्मणे ऐसी अगाध जे कीर्ति । भोळ्या भक्तांप्रति दावीतसे ॥४॥
