गोवळे ह्मणती कांहो आ
233.
गोवळे ह्मणती कांहो आह्मा भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी ॥१॥
गाई तृप्त करी कळबाच्या तळी । सोडिल्या शि-दोरी दावितसे ॥२॥
हमामा घालिता नव्हती माघारे । नाही भीत पोरे येत संगे ॥३॥
नामा म्हणे काय भिऊनि राहिले । नि-वांतचि ठेले ब्रह्मदिक ॥४॥
